संदेश सदानंद शिंदे, वाचक

जयेश मेस्त्री अधून मधून “सामना”त भेटीला येतो. मनाला बरं वाटेल असं लिहितो… त्याचं पुस्तक “शरसंधान”. काही गोष्टींचे योग यावे लागतात हेच खरं. जयेशची लेखणी इतकी जहाल असेल याचा अंदाज “सामना”मधल्या त्याच्या लेखांवरुन मला अजिबात आला नव्हता हे अगदी प्रामाणिकपणे मान्य केलंच पाहिजे. तर वर म्हटल्या प्रमाणे हे शरसंधान माझ्यावर चालवून घेण्याचा योग आला नि साडेआठ […]

राजेश पुरोहित, वाचक

I read this (Sharasandhaan) book. Excellent book. Must Read by every Hindu. especially young. simple language and short size is plus point to attract new readers. as many bigger books with complicated terms every general person wont read. Congratulation dear friend & all the best for your future.

अपूर्वा आपटे, विद्यार्थीनी बीएमएम

आपलं (जयेश शत्रुघ्न मेस्त्री) शरसंधान हे पुस्तक मला प्रेरणादायक ठरलं व माझ्या ज्ञानात भर पाडणारं ठरलं. त्यासाठी मी आपली ऋणी आहे. (शरसंधान हे पुस्तक वाचून दिलेली प्रतिक्रीया)

हर्षद माने

जयेश मेस्त्री अतिशय विचारी, प्रतिभाशाली लेखक आहेतच, पण एक अतिशय विचारी तरुण आहेत, ज्यांच्या अंगी सद्यस्थिती बदलण्याची इच्छाही आहे, ऊर्मीही आहे. एखादे कार्य अधिक चांगल्या रीतीने कसे करता येईल हे समजण्याची आणि करण्याची त्यांची हातोटी सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान देऊन जाईल. (संस्थापक, प्रबोधक)

निलेश बामणे

मला जयेशचा सगळ्यात चांगला गुण आवडतो तो म्हणजे, जयेश प्रत्येक गोष्ट लहान मुलासारखा तल्लीन होऊन शिकतो. त्याने अभिनयाचा, लिखाणाचा कुठलाच कोर्स केला नाही, कोणत्याही शिबीरात तो गेला नाही. तो हे जे काही शिकला ते बघून शिकला. लोकांचे चांगले गुण आत्मसात करणे हि त्याची खुबी आहे. (संपादक, साहित्य उपेक्षितांचे)

अरविंद विठ्ठल कुळकर्णी

जयेश मेस्त्री यांची लेखणी नवथर असली तरी ती एकमार्गी नसून साहित्याच्या विविध प्रांगणात तिला हिंडण्या फिरण्याचा सोस आहे. – वरिष्ठ पत्रकार