Crispy

टाळकीचे भोई; अर्थात संगीत मुर्खांचा बाजार

टाळकीचे भोई; अर्थात संगीत मुर्खांचा बाजार

(पडता उघडतो. रंगमंचावर अंधार. तेवढ्यात टाळक्यात अंधार असलेले ५ लोक रंगमांचावर येतात. हळू हळू रंगमंचावर प्रकाश… पण त्यांच्या टाळक्यात अजूनही अंधार असतो… आता ५ जण मिळून गाणं गातात…)

हम पांच…
पा पा पा पांच…
हम पांच… (५ वेळा)

एक: ए दुसरीच्या, आजचा काय विषय हाय.
दोन: ए पयलीच्या, आपला रोजचाच. इतीर्‍हास.. स्वॉरी.. इतिहास…
तीन: अरे मग सांगा की… पयला कोण सांगणार.
एक: मीच पयला…
चार: बरं सांग पयलीच्या.
एक: सांगतो, फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात आपल्या पत्नीसोबत रावण राहत होता.
पाच: राम म्हणायचंय का?
एक: इतिहास मी सांगतोय ना? मग रावणच… तर फार फार वर्षांपूर्वी एका जंगलात रावण राहत होता.
चार: ए… राम-रावण नको. काहीतरी वेगळ सांग…
एक: बरं… मग भीमा-कोरेगाव?
तीन: नको नको… आपले परकास, सारखे साखे दंगलीची हिंट देतात.
एक: अरे मग काय सांगू?
पाच: मी सांगू?
एक: नको मीच सांगणार. मी वरीष्ठ आहे.
पाच: अरे मी तेच म्हणतोय. तू काय सांगवंस हे मी सांगतो.
एक: बरं बरं…
पाच: तू सर्वांच्या चरित्राची वन लाईन सांग…
एक: वन लाईन?
पाच: होय वन लाईन… आता वन लाईनरचाच जमाना हाय ना.
एक: ओके..
दोन: थांबा… थांबा… आपण सगळेच टाळकीचे भोई आहोत. म्हणून आपण सर्वांनीच आपल्या टाळक्याचं प्रदर्शन केलं पाहिजे. एकेक करुन सर्वजण वन लाईन बोलतील. चल, पयलीच्या सुरुवात कर.
एक: होय दुसरीच्या… सिकंदर हा जगज्जेता होता.
दोन: शिवाजी महाराजांच्या सैन्यात २० लाख मुसलमान होते.
तीन: इंग्रज हे समाजसुधारक असून त्यांनी जातीयवादी पेशवाई नष्ट केली.
चार: सावरकर हे क्रांतीकारक नव्हते आणि सनातनी होते.
पाच: गांधीजींनी शस्त्र न उचलता अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिलं.
एक: अफझलखान शांतीप्रिय होता.
दोन: मुसलमान आक्रमकांनी कोणाचाच छळ केला नाही.
तीन: ब्राह्मण युरोपातून आले.
चार: शूद्र हे मूलनिवासी आहेत.
पाच: औरंगझेब न्यायप्रिय होता.

(आणि रंगमंचावर हळू हळू अंधार होऊ लागतो, त्यांच्या टाळक्यातही अंधारच असतो. अंधारातही त्यांचा आवाज ५ वेळा इको या न्यायाने घुमू लागतो. पडदा)

दिल्लीचा भाट जयेशचंद्र

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01