Poem

सिलसिला…

हा चंद्र, तो सूर्य, झाला फैसला माझा.
हेच उरले आता ऐकाया सिलसिला माझा.

मी माझ्या नभात तेव्हा माळले आशेचे तारे.
तेच आताशा कुठे बळावतात हौसला माझा.

मी न पाहिले तिला कधीही उगी वळुनी.
तरीही ते रान गाते इश्काचा मसला माझा.

आता मनाचा दगड आसवे पाझरतो.
सांग तेव्हा अंदाज का रे फसला माझा.

मी होऊनी वीट शोधतो पाय हरीचे.
माझ्यावर देव, हाय का रुसला माझा.

कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01