Articles

सौरभ गोखलेची मुलाखत


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

२०१३ मध्ये महाराष्ट्र २४ तास साठी सौ. रेशमा मेस्त्रीने घेतलेली ही छोटेखानी मुलाखत. वाचा आणि आपली प्रतिक्रीया अवश्य द्या.

प्रश्न : तू पिंपरीतील डॉक्टर कुटूंबातील मुलगा. एमबीए करुन मग जॉब केलास. आता पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात आहेस. तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांग. अभिनयाची सुरुवात कशी झाली?

सौरभ : तसं पाहायला गेलं तर मी लहानपणासून शाळेत कॉलेजमध्ये अभिनय करायचो. पण शिक्षणाच्या बाबतीत मी तितकाच सिरीयस होतो. मी बीकॉम केलं, मासकॉम, कंपनीमध्ये कामाचा अनुभव घेतला. एमबीए केलं आणि मग ठरवलं की आता पूर्णवेळ या क्षेत्रात यायला हरकत नाही… आणि पूर्णवेळ या क्षेत्रात आलो.

प्रश्न : राधा ही बावरीतला सौरभ आणि खर्‍या आयुष्यातील सौरभ हे दोन्ही सारखेच आहेत की वेगवेगळे?

सौरभ : हा..हा.. राधा ही बावरीतला सौरभ आपल्या करीयरच्या बाबतीत सिरीयस नाही. माझं त्याउलट आहे, मी आपल्या करीयरच्या बाबतीत खुप सिरीयस आहे. इतर गोष्टी म्हणार तर मस्ती स्वभाव वगैरे सगळं सारखच आहे. पण ह्या एका गोष्टी बाबतीत पुष्कळ फरक आहे.

प्रश्न : यापूर्वी तू गंभीर भुमिकाही केल्या आहेस. पण ही चॉकलेट बॉयची भुमिका कशामुळे लोकप्रिय झाली?

सौरभ : कसं असतं की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रत्येकात मॅच्युरिटी येते, गंभीरता येते. पण बालिशपणा सगळ्यांना आवडतो. त्यामुळे तो लोकांना आपला वाटला. आणि प्रत्येकाला वाटत असेल की मी सौरभच्या जागी असतो तर असम केलं असत, तसं केलं असतं. म्हणून कदाचित तो लोकांच्या जास्त पसंतीस उतरला असेल.

प्रश्न : तू योद्धा या चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भुमिका केली आहेस. ही भुमिका तुझ्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेदणारी आहे का?

सौरभ : छेदणारी वगैरे नाही… मुळात मला एका इमेजमध्ये अडकून राहायला आवडत नाही. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका करायच्या आहेत.

प्रश्न : अभिनय करताना तु त्या त्या भुमिकेचा आभ्यास करतोस का?

सौरभ : हो… नक्कीच करतो. जर भुमिका चांगली करायची असेल तर आधी ती आपल्याला कळायला हवी. जसं योद्धाची भुमिका करता अभ्यास केला की त्या पोलिसांना तसं ट्रेनींग दिलेलं असतं की कैद्यांसोबत कसं वागायचं, ती बॉडी लॅंग्वेज वगैरे.. मी सगळं ऑब्जर्व करतो.

प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.

सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.

प्रश्न : अनुजाशी तुझी ओळख कशी झाली?

सौरभ : तसं बघायला गेलं तर “मांडला दोन घडीचा डाव” या मालिकेमध्ये आम्ही एकमेकांना भेटलो आणि प्रेमात पडलो. पण नंतर कळलं की माझ्या सख्या मावस भावाची ती मैत्रीण होती आणि तिचा सख्खा मोठा भाऊ व मी शाळेत वर्गमित्र होतो. तरी तेव्हा आमची पूण्यात असूनही कधीच अशी भेट झाली नाही. कदाचित आम्हाला मुंबईला आल्यानंतर भेटायचं होतं.

प्रश्न : आपल्या बीझी श्येड्युलमधून तुम्ही एकमेकांना कसा वेल देतात?

सौरभ : हो… वेळ म्हणजे तो काढावा लागतो. अनुजा सुद्धा चांगली अभिनेत्री आहे, त्यामुळे ती सुद्धा बीझी असते. म्हणून शुटींग नसते तेव्हा आम्ही एकमेकांसोबत असतो किंवा एकत्र कॉफी पिणे वगैरे… अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपलं प्रेम व्यक्त करतो. सुट्टी फारच कमी असते. म्हणून आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करतो.

प्रश्न : तुझ्या पुढच्या प्लॅनबद्द्ल किंवा प्रॉजेक्टबद्दल आम्हाला काही सांग

सौरभ : सध्या तर राधा ही बावरी सुरु आहे, आणि चित्रपट आहेत. मला वाटते पुढच्या सहा महिन्यांत दोन चित्रपट यायल हवेत.

प्रश्न : तुला नाटकांत काम करायला आवडेल का?

सौरभ : हो नक्कीच आवडेल. मी सुरुवातीला नाटकातच काम करायचो. नंतर मग सिरीयल सुरु झाल्या, आता चित्रपट त्यामुळे या सगळ्या शेड्युलमधून रिहर्सलला वेळ नाही मिळत. पण जर तसा वेल असेल तर नाटकांत काम करायला नक्कीच आवडेल.

प्रश्न : कुठलं शहर जास्त आवडतं, मुंबई की पुणे?

सौरभ : दोन्हीही, कारण जर का करीयरच्या दष्टीकोनातून विचार केला तर मुंबईत खुप स्कोप आहे. जागा लहान व लोकसंख्या जास्त असल्यामुळे थोडा त्रास होतो. पण करीयर आहे ते मुंबईत. म्हणून तर लोक लांबून य्रेथे येतात आणि पुण्याचं म्हणाल तर राहण्यासाठी पुण्यासारखी जागा नाही. लोक राहण्यासाठी पुण्यात येतात. पुण्यात माझं घर असल्यामुळे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरं मला सारखीच वाटतात.

प्रश्न : तुझी आवडती डीश आणि ड्रिंक कोणती?

सौरभ : बाबेक्यु मला आवडते आणि फिशही आवडते. त्यामुळे बाबेक्यु फिश असेल तर नक्कीच आवडेल आणि ड्रिंक कोणतीही मिल्कशेक किंवा कोल्डिंक्स मला आवडतं.

प्रश्न : कोणत्या प्रकारची भुमिका करायला तुला आवडेल?

सौरभ : असं काही ठरलं नाही. पण एका इमेजमध्ये अडकून न राहता वेगवेगळ्या भुमिका करायला आवडेल.

प्रश्न : तुला एखादी जादूची कांडी मिळाली तर काय करशील?

सौरभ : हा.. हा.. हा.. जादूची कांडी जर मला मिळाली तर मी एका बेटावर घर बांधीन. तिथे खुप सारे डॉगीज ठेवीन. एक फार्म हाऊस बनवेन व तिथे मी आणि माझी बायको खुप धम्माल करु.

मुलाखत: सौ. रेशमा मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01