Crispy

मंत्रालयात मेले सोम्या उंदिर

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

मंत्रालयात मेले सोम्या उंदिर;
सर्वां कळाले, ’खडसे’डल्यावर;
उंदरांवरती उंदिर मारले;
रेकॉर्ड घडले, हासडल्यावर;
पटीत मेले विष घेऊन;
निती सांडली भाजली पोळी
भ्रष्टी-लीन तर घोळून पिऊन

जगवायची पण युक्ती आहे;
मारायची पण युक्ती आहे.

भ्रष्टतेचे लहरी डोळे,
पैशांचे पण;
गहाळ झोळे
बाकांखालून जमले तेंही
मार-कलटी, मार-कलटी!
भ्रष्टांवरती भ्रष्ट चढले;
मंत्रालयात उंदिर, मेले? मेले?

विडंबन: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
(मूळ कविता: पिपांत मेले ओल्या उंदिर. कवी: बा.सी. मर्ढेकर)

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01