महापात्रा… भाग – ४

(सर्वप्रथम तुम्हा वाचकांची क्षमा मागतो… प्रत्येक भाग पोस्ट करायला खूप उशीर होतोय याची जाणीव मला आहे. पण माझा व्यवसाय लेखन असल्यामुळे आणि ही कथा लिहिण्यास कमी वेळ मिळत असल्यामुळे माझ्याकडून उशीर होतोय. ही कथा जशी मी लिहितो तशी पोस्ट करतोय… तरी तुम्हा वाचकांचा जो प्रतिसाद मिळतोय याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. माझ्याकडून जो विलंब होतो त्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल कशी खात्री बाळगतो. महापात्राचे सर्व भाग वाचण्यासाठी तुम्ही #महापात्रा_दीर्घ_कथा हा हॅशटॅगवर क्लिक करु शकता… आणि ही कथा मालिका कधिकाधिक शेअर करुन अनेक लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती)

त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं, तिने आपल्या पदराने तिचा ब्लाऊज आणि उघडं पोट झाकलं… आणि तो एक आवंढा गिळत म्हणाला, नमस्ते भाभी… त्याची ही हरकत आदित्यनाथने पाहिली… त्याचा पारा चढला आणि तो म्हणाला भोसडीच्या… माझ्या घरच्या बाईकडे वाकडी नजर टाकायची नाही… म्हणत त्याला एक ठोसा लगावला… आदित्यनाथ शून्यात पाहत होता… शेठ म्हणाला आता येतो मी… पण आदित्यनाथचं भान हरपलं होतं… शेठ पुन्हा म्हणाला कुठे हरवलात… म्हटलं येतो मी… आदित्यनाथ भानावर आला तेव्हा शेठ चालू पडला होता… आदित्यनाथ विचार करु लागला की खरोखर आपल्या अंगत इतकी धमक असती तर… आपण कुणाला ठोसा लगावू शकलो असतो तर किती बरं झालं असतं… मनातली सगळी भडास काढता आली असती… पण तो एक बिचारा ब्राह्मण… त्यात महापात्रा… त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कुणावर हात उचलला नव्हता… आजतागायत बायोकाली त्याने कधी मारले नव्हते… कधी कधी तिची इच्छा नसताना संभोग करायचा. पण ही काही एकट्या आदित्यनाथची चूक नाही… ही तर बहुसंख्य पुरुषजातीची तर्‍हाच आहे…

आज आदित्यनाथला तसे चांगले पैसे मिळाले होते. दोन तीन महिन्यांच्या राशनचा प्रश्न सुटला होता… पण ते तर दर महिन्याचं होतं… अंत्यविधीत मिळालेलं सामान विकलं तर दर महिन्याला किमान ८ ते १० हजार रुपये मिळायचे. आता तुम्ही म्हणाल हे पाप आहे… हे चूकीचं आहे… पण उपाशी मरणं हे सर्वात मोठं पाप आहे. पोटासाठी काही गोष्टी इकडच्या तिकडे केल्या तर बिघडलं कुठे… इतर पौरोहित्यांप्रमाणे पूजा-अर्चेचा मान आदित्यनाथला नव्हता… म्हणून श्राद्ध, वर्षश्राद्ध आणि अंतम संस्कार यावरच त्याला अवलंबून राहावं लागत असे. गावात दोन तीन महिने कुणाचा मृत्यू झालाच नाही तर काय करावं? हा प्रश्न आदित्यनाथला नेहमी सतावत होता… कारण लोकांच्या मृत्यूमुळेच त्याच्य अघरी डाळ रोटी शिजत होती. जसं एखादा आस्तिक डॉक्टर नेहमी देवाकडे लोकांच्या आजारपणासाठी प्रार्थना करत असणार… एखादा नास्तिक डॉक्टर जर असेल तर तो लोक आजारी पडायची आस लावून बसत असणार… त्याचप्रमाणे आदित्यनाथ लोकांच्या मृत्यूची प्रतीक्षा करीत बसत… या त्याच्या व्यवसायामुळेच आणि व्यवसायातील अनिश्चिता… यामुळे तुम्हाला जे पाप वाटतं ते पूण्य तो करत होता… कुटुंबाचं पालपोषण करण हे पुण्याचंच काम आहे. याअर्थाने हे पूण्य…

आदित्यनाथने ते पैसे आतल्या खोलीच्या एका डब्यात ठेवले. त्यातले साडे तीन हजार काढून सिंधून दिले व म्हणाला बनियाचे २ हजार बाकी आहेत ते देऊन टाक आणि आता जे सामान आणशील ते रोकड देऊन आण… तिने होकारार्थी मान हलवली… त्याला अचानक शेठची आठवण झाली… त्याच्या नजरेसमोर शेठच्या त्या वासनांध नजरा फिरु लागल्या… त्याचे सिंधू एकटक पाहिलं… सिंधू म्हणाली अजून काही बोलायचं आहे का? तो म्हणाला आतल्या खोलीत चल… तिच्या ह्रदयात धस्स झालं… तिला कळलं की स्वारींच्या उत्तेजना शोगेला पोहोचल्या आहेत… इच्छा नसतानाही आज पुन्हा त्याच्यासाठी आपल्या शरीराची शय्या करवी लागणार आहे. ती त्याच्या मागोमाग आत गेली. दरवाजा लावून घेतला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले… ती खोटंखोटं जराशी लाजली. असा समज आहे की आपला पुरुष जवळ आल्यावर जर स्त्री लाजली नाही तर ती चारीत्र्यहीन आहे. म्हणून सिंधू कधीकधी बळेबळे लाजायची… आदित्यनाथने तिच्या हातांचं चुंबन घेतलं आणि म्हणाला माझ्याकडून काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर मला माफ कर… तिने आपली हनुवटी वर उचलत आदित्यनाथच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या डोळ्यात वासना नव्हती… निव्वळ प्रेम होतं आणि ते प्रेम अश्रू म्हणून वाहत होतं… तिने आपल्या बोटांनी त्याचे अश्रू पुसले. म्हणाली काय झालंय आज तुम्हाला? तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे… तुला जेव्हा मी पाहायला आलो होतो तेव्हा तुला पाहताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो… तू होतीच तशी… कुणीही प्रेमात पडावं अशी… आजही तशीच आहेस… पण तू माझ्यात काय पाहिलंस? ती म्हणाली घरच्यांनी सांगितलं की लग्न करावं लागेल म्हणून मी केलं… त्याचा चेहरा पडला… म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही? निराशेने म्हणाला… ती म्हणाली तसं नाही… म्हणजे बघता क्षणी मी प्रेमात पडले नाही… पण आज इतकी वर्षे झाली लग्नाला… तुमचा चांगूलपणा… मला खूप भावतो… मला तुम्ही आवडता… माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात… तिने त्याला गच्च मिठी मारली… तिने अश्रूनेच आपल्या पतीदेवाला अर्घ्य वाहिले…

दोघंही नवविवाहित जोडप्याप्रमाणे अत्यंत प्रेमाने वागत होते. कपड्यांचा अडथळा कधी दूर झाला आणि कधी त्यांची तनुवेल एक झाली हे त्यांनाच कळलं नाही… आज कित्येक दिवसांनी सिंधू तृत्प झाली होती. शरीराच्या तृप्तीपेक्षा मनाची तृप्ती खूप महत्वाची असते… वीर्याचा सुगंध सबंध खोलीत पसरला…

दिवसामागून दिवस जात होते… तेच ते आयुष्य आणि तिच ती मढी… गरमीचे दिवस सुरु झाले होते… मिथिला आणि रिशभ अभ्यासात हुशार होते म्हणून त्याला आपल्या मुलांची चिंता नव्हती… रिशभला आपल्या व्यवसायात आणायचं नाही हे त्याने पक्क ठरवलं होतं… पण रिशभ मात्र शास्त्राबद्दल वडीलांपाशी विचारणा करत राहायचा… ह्याच्यात काय असतं? हे केलं तर काय होईल? देव… दानव… स्वर्ग… नर्क.. जन्म… मृत्यू असे अनेक प्रश्न त्याला पडायचे. आदित्यनाथला भिती वाटायची की हा सुद्धा आपल्या व्यवसायात आला तर आलाही आपल्यासारखं तुच्छतेचं आयुष्य जगावं लागेल… नको… नको… त्यापेक्षा आपण मुलाची समजूत काढली पाहिजे… तो सतत रिशभला शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचा… उच्च शिक्षणाने दलित माणूसही महामानव होतो हे तो अधोरेखित करायचा… मिथिलेची काळजीही त्याला होतीच… प्रदेशचं वातावरण तसं एवढं चांगलं नाही… त्यात स्त्री म्हटली की… आणि वर त्याचा मोठा भाऊ तिचं लग्न करण्यासाठी मागे लागला होता… आता मुलगी वयात आलीय… तिला घरात ठेवून काय करणार? लोक काय म्हणतील? आता सासरी जाऊन त्याचं घर सांभाळावं… मोठ्या भावाचे हे शब्द त्याच्या कानात एकच कल्लोळ माजवत होते… रात्रीचे १२ वाजून गेले होते. सगळे गाढ झोपेत. पण आदित्यनाथ मात्र कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर… त्याला झोपंच येईना… इतक्यात दारावर ठकठक झाली… त्याची तंद्री चाळवली… इतक्या रात्री कोण आलं असेल… ग्राहकाशिवाय इतक्या रात्री कुणीच दरवाजा ठोठावणार नाही… पण रात्रीचे १२ वाजून गेल्यावर? पुन्हा जोरात ठकठक झाली… सिंधू जागी झाली… तो बाहेरच्या खोलीत आला व म्हणाला… मी बघतो… झोप तू… त्याने दार उघडलं तर दारात चार माणसं उभी होती… कपडाने त्यांनी तोंडं झाकलं होतं… डोळे सुजले होते. कदाचित प्यायलेले असतील… त्यांच्या हातात धारदार हत्यारं होती… आदित्यनाथ घाबरला… एक माणूस करड्या आवाजात म्हणाला… चला… जायचंय… आदित्यनाथ म्हणाला कुठे? दुसरा माणूस म्हणाला कोठ्यावर जायचंय. येणार का? या वाह्यात विनोदावर सगळेच हसले. तो माणूस म्हणाला तुम्हाला कशाला घेऊन जाणार आम्ही? अंतिम संस्कार करायचा आहे… पैसे चांगले मिळतील… तीन महिने कुणी मेलं नाही तरी काम भागेल तुमचं एवढे पैसे मिळतील… आदित्यनाथ म्हणाला तुम्ही थांबा. मी तयार होऊन येतो… त्यात एक माणूस म्हणाला लवकर या… वाट पाहायला आम्ही काय तुझे जावय नाही… आपल्या मुलीवर शेरेबाजी केल्यामुळे आदित्यनाथच्या मुठी आवळल्या गेल्या… पण त्याने काही न म्हणता दार लावलं… तयार झाला व सिंधूला म्हणाला… आता कदचित पहाटेच येईन मी… दार मुळीच उघडू नकोस… माझा आवाज ऐकला तरंच दार उघड… ती काळजीपोटी म्हणाली सांभाळून जा… लवकर या… त्याने तिच्या कपाळाचं चुंबर घेतलं आणि त्या माणसांसोबत जीपमध्ये बसून निघून गेला…

क्रमशः

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#महापात्रा_दीर्घ_कथा
#jayeshmestry


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01