Drama / Story

महापात्रा… भाग – ३

महापात्रा… भाग – ३

पण एके ठिकाणी त्याची नजर खिळली. त्याची कुतुहलता जागी झाली… त्या रात्रीचा तो तरुण त्याला बाजारात दिसला… हो तोच… ज्याच्या बायकोवर त्याच्याच बापाने बलात्कार केला होता… आदित्यनाथने त्याला गाठायचं ठरवलं… तो त्या तरुणाच्या दिशेने जाऊ लागला… त्याने अखेर तरुणाला गाठलंच… त्याच्या समोर अचानक उभा राहून म्हणाला ओळखला का? तरुणाला काही कळेना… त्याने नकारार्थी मान हलवली… आदित्यनाथ त्याला आठवण करुन देत म्हणाला त्या रात्री स्मशानात… आदित्यनाथ पुढे काही बोलणार इतक्यात तरुणाने त्याला सावध केलं आणि म्हणाला पुन्हा मला कधी भेटू नको, मी रस्त्यात दिसलो तरी ओळख दाखवू नकोस. नाहीतर तुझाच अंतिम संस्कार करावा लागेल. तू माझ्या बापाला नीट ओळखत नाहीस. तो काहीही करु शकतो. आदित्यनाथ त्याला म्हणाला की पण तुझं तर तिच्यावर प्रेम होतं ना? तो तरुण म्हणाला मनापासून प्रेम होतं… पण… आता त्याचा उपयोग नाही. मी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर माझे पिताजी मला सुद्धा मारुन टाकतील… आदित्यनाथ म्हणाला आपल्याच मुलाला मारुन टाकतील? माणूस आहे की हैवान? त्या तरुणाची मुद्रा बदलली… म्हणाला हैवानच आहे तो… पण तो एकटाच हैवान नाही. तर प्रदेशात असे कित्येक हैवान आहेत. कधी कधी मला वाटतं ह्यांच्यात राहून मी सुद्धा हैवान होत चाललोय… चल मी जातो आता… तुझ्यासोबत जर बडे पापा पाहिलं ना… तर… आदित्यनाथने आपल्या मेंदूवर जोर देत म्हटलं बडे पापा म्हणजे त्या दिवशी ते तुझ्या पिताजीची समजून काढत होते ते? फारच भला माणूस वाटला मला तो… तो तरुण नाकाच्या खालून बोट फिरवत म्हणाला भला माणूस? माझ्या बायकोवर पहिली वाईट नजर तर त्यानेच टाकली होती… आणि मग जेव्हा मी घरी नसायचो तेव्हा हे दोघे मिळून… श्शी… असं म्हणत तो तरुण भराभर पावलं टाकत गर्दीत नाहिसा झाला…

आदित्यनाथने विचार केला आपण आपल्या हक्काच्या पत्नीसोबत कधीतरी तुसडेपणाने वागतो तेव्हा आपल्याला आपण हैवान असल्यासारखं वाटतं… मग या हैवानांना कोणती उपमा द्यावी? कदाचित हैवानपणाचा टप्पा आपण अजून गाठलेलाही नाही… तो विचार करत करत मिथिलेच्या शाळेच्या दिशेने चालला होता. वाटेत गोवंश इलाका लागतो.. गोवंश इलाक्यात बहुतेच ब्राह्मण कुटुंब राहतात… पण हा ब्राह्मण मात्र या ब्राह्मण कुटुंबापासून जरा दूर राहतो. महापात्राला या गोवंश इलाक्यात राहण्याची अनुमती नाही… आदित्यनाथ जात असतानाच केशव मिश्रा नावाचा एक कर्मठ ब्राह्मण त्याला भेटला… आदित्यनाथला पाहून त्याने नाक मुरडले आणि म्हणाला… आज काय? कोणाचं श्राद्ध घालायला चाललायस? आदित्यनाथने केशव मिश्रा वर्ग मित्र होते. दोघेही जातीने ब्राह्मण… पण आदित्यनाथ महापात्रा असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच अंतर राहिलेलं आहे. केवश मिश्रा होताही रुबाबदार… छान उंच, गोरापान… घारे डोळे… त्याच्या व्यक्तीमत्वात ब्रह्मतेज झळकत असे… आदित्यनाथ म्हणाल मी मुलीच्या शाळेत चाललोय… आज तिचा रिजल्ट लागणार आहे. हो का… मुलगी शिकून काय करणार? एके दिवशी तिला दुसर्‍यांच्या घरची चूल तर पेटवायची आहे आणि चूल पेटवण्यासाठी कशाला हवंय शिक्षण? आदित्यनाथ म्हणाला तुझी मुलगी माझ्याच मुलीच्या वर्गात आहे. त्यावर चिडून मिश्रा म्हणाला अरे आपली कधी बरोबरी होऊ शकते का? आमच्या मुली शिकलेल्याच हव्यात. मुली जितक्या शिकतात तितकं चांगलं स्थळ येतं त्यांच्यासाठी… चांगला सराकरी बाबू बघणार आहे मी… तसंही या व्यवसायात आता पहिल्यासारखा दम राहिला नाही… चल तुझ्याशी कशाला बोलत बसलोय मी… चल मला पूजा सांगायला जायचंय… तुझ्यासारखं मेलेल्याच्या टाळूवरचं नाही खात ना मी… असं म्हणत मिश्रा आपल्या वाटेला लागला…

आदित्यनाथला या गोष्टीचं मुळीच वाईट वाटलं नाही. असले टोमणे तो लहानपणापासून ऐकत आला होता… म्हणूनच आता तो कोडगा झाला होता… त्याचे दादाजी त्याला नेहमी म्हणायचे आपल्यामध्ये आणि चांडाळामध्ये केवळ जातीचाच फरक आहे, कुवत तिच… आदित्यनाथ शाळेत पोहोचला… त्याने शिपायाला नववीचा वर्ग कुठाय असं विचारलं… शिपायाने तंबाखू तोंडात कोंबला असल्यामुळे बोटानेच वर्ग दाखवला… आदित्यनाथने वर्गात डोकावून पाहिलं. तर वर्गात काही पालक आधीच येऊन बसले होते. मिथिलेने आपल्या बापाला हात दाखवला. आदित्यनाथानेही थांब आलोच असा हाताने इशारा केला… तेवढ्यात मागून एक रसाळ आवाज आला? कोण हवंय तुम्हाला? आदित्यनाथने वळून पाहिलं… तर समोर २५ वर्षांची एक नखशिखा उभी होती. आदित्यनाथने तिला पाहिलं… तिचं सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा विचार त्याच्या मनात आला… पण लगेच त्याला आपल्या वयाचे भान झाले आणि म्हणाला बेटा, मैं… मेरी बेटी… तेवढ्यात मिथिला धावत आली व म्हणाली अचला टिचर, हे माझे बाबा आहेत… त्या रुपवतीचं नाव अचला… ती मिथिलाची क्लास टिचर… अचला… अचला इतकी सुंदर होती की तिच्या संपूर्ण शरीरावर एक पुरळही नव्हता… तिचं नाक सरळ व लांब होतं… डोळे मोठे पण रेखीव… स्थनांना नुकतीच वाट फुटली होती… आदित्यनाथ आणि अचलाही तोंडओळख झाली… सर्व पालकांना रिजल्ट दाखवण्यात आले. मिथिलेला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याने आदित्यनाथ खूपच खुश झाला. पोरगी आपलं नाव काढणार…

अचला आणि मिथिलाचे खूप चांगले संबंध होते. गुरु शिष्य इतकंच मर्यादित नातं त्यांच्यात नव्हतं तर एक लहान बहिण आणि मोठी बहिण असं सखोल नातं त्यांच्यात निर्माण झालं होतं. कधीकधी मिथिला अचलाच्या घरी सुद्धा जायची… बर्‍याचदा मिथिलेच्या बोलण्यातून अचलाचं वर्णन आदित्यनाथने ऐकलं होतं. पण त्या सौंदर्याच्या देवीचं प्रत्यक्ष दर्शन मात्र आज झालं…

ठरल्याप्रमाणे रात्री ९ वा. शेठ आला… आदित्यनाथ आणि शेठ आतल्या खोलीतच भेटायचे… आधी दारु.. मग धंदा… त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या… तेवढ्यात मिथिला कापलेला मुळा घेऊन आली… सिंधूला आत यायची सक्ती होती… शेठने आपला चष्मा खाली करुन मिथिलेच्या उभरत्या उरोजाकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि म्हणाला मुली किती पटकन मोठ्या होत्यात नै… आदित्यनाथचं तोंड कडू झालं… हा नेमका कोणत्या अर्थाने म्हणाला हे आदित्यनाथला कळलं… शेठचं नाव तसं खूपच खराब… बाईच्या बाबतीत शेठ अगदी नासलेलाच म्हणा… पण धंद्यासाठी कधीकधी काही गोष्ट सहन कराव्या लागतात… शेठने मिथिलेला जवळ बोलावत आधी तिच्या डोक्यावरुन आणि मग पाठीवरौन हात फिरवला… आदित्यनाथने तिला हुकूम सोडला की चल… चल लवकर अभ्यासाल बस… आणि रिशभला सांग… काही काम असेल तर मी त्याला हाक मारेन. ती हो म्हणत बाहेर पडली… त्यांचा दारुचा कार्यक्रम उरकला… मग आदित्यनाथने एका कोपर्‍यातून एक मोठं गाठोडं बाहेर काढलं… त्यात अनेक पूजेचं सामान आणि दागिने होते… हे त्याला अंतिम संस्कार विधीच्या वेळी मिळालेलं सामान… हे साठवून ठेवायचं आणि महिन्यातून एकदा शेठला विकायचं… हा सुद्धा एक जोड धंदा म्हणायला हरकत नाही… शेठने सामानावरुन नजर फिरवली, एका कापडातून तराजू काढला आणि माप घेऊन म्हणाला… १० हजार होतील… आदित्यनाथ नाक मुरडत म्हणाला १० हजार? श्रीमंत घरातून आलेलं सामान आहे… शेठ म्हणाला बरोबर आहे. पण हा धंदा सुद्धा गुप्त आहे ना… उद्या जर कुणाला कळलं तर काय होईल? मी काय व्यापारी माणूस पण तुझी केवढी छी थू होईल… आदित्यनाथच्या कपाळाला आट्या पडल्या… तो म्हणाला… १५ हजार दे नाहीतर मी अमिर शेठकडे माल विकेन.. त्याबरोबर किरण शेठ नरमला… म्हणाला साडे तेरा हजार… बस्स. या उपर एक रुप्पया देणार नाही… असं म्हणत पैसे झपाझप मोजत त्याने आदित्यनाथच्या हातात टेकवलेच… आणि चालू पडला… बाहेर आल्यावर अखेर त्याला सिंधू दिसलीच… सिंधू पाहताच त्याची नजर बदलली… त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं, तिने आपल्या पदराने तिचं ब्लाऊज आणि उघडं पोट झाकलं… आणि तो एक आवंढा गिळत म्हणाला, नमस्ते भाभी… त्याची ही हरकत आदित्यनाथने पाहिली… त्याचा पारा चढला आणि तो म्हणाला भोसडीच्या… माझ्या घरच्या बाईकडे वाकडी नजर टाकायची नाही… म्हणत त्याला एक ठोसा लगावला…

क्रमशः
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#महापात्रा_दीर्घ_कथा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01