Drama / Story

महापात्रा… भाग – २

महापात्रा… भाग – २

आदित्यनाथमधला पुरुष आता जागा झाला होता… तो उठला त्याने तिला मागून गच्च मिठी मारली आणि आपले दोन्ही हात तिच्या उरोजावर नेले… ती नको… नको म्हणत असताना सुद्धा तो तिच्याशी लगट करत होता आणि अचानक त्याला तो आवाज पुन्हा ऐकू आला… नको नको… खूप त्रास होतोय… दुखतंय… थोंबतंय… त्याने सिंधूला सोडलं… तशी ती बाहेर निघून गेली… तो आवाज आता अगदीच स्पष्ट ऐकू येत होता… त्याने गटागटा दारु संपवली… पण आता तर चारही दिशेने आवाज येऊ लागला… त्याने आपल्या कानावर हात ठेवला… पण आवाज थांबेच ना…

मग तो एका कोपर्‍यात बसून मुकाट्याने आवाज ऐकू लागला… त्या आवाजाच्या कल्लोळात कधी त्याचे डोळे मिटले आणि कधी सकाळ झाली हे त्यालाही कळलं नाही. त्याची दारु उतरली होती. पण डोकं अजूनही भिनभिनत होतं… सकाळी नेहमीप्रमाणे प्रातर्विधी आटोपून पूजा अर्चा करुन तो अंगणात झोपाळ्यावर बसला होता. त्याचा लहान मुलगा रिशभ जो आता ५ वीत आहे आणि सिंधू शाळेत जायला निघाले. सिंधूने त्याच्यासाठी चहा नाश्ता आणला… त्याने सिंधूला बाजूलाच बसायला सांगितले. सिंधू आणि आदित्यनाथचं नातं हे केवळ संभोगापुरतं नवरा बायकोचं होतं. तो पुरुषी संस्कृतीत वाढला असल्यामुळे बाईने केवळ मुलं वाढवायची, सांभाळायची आणि नवर्‍याची कामवासना शमवायची असाच त्याचा समज होता. यात त्याचाही काही दोष नाही. लहानपणापासून तो जसा वाढला तसाच आता वागत होता. माणसाचं वर्तमान हे त्याच्या भूतकाळावर अवलंबुन असतं. आदित्यनाथच्या पौरुषी वागण्यामागचं दुसरं कारण म्हणजे समाजाकडून त्याला मिळणारी कुत्सित वागणूक. आपण महापात्रा… आपण ब्राह्मणांमधले दलित हा भाव अगदी लहानपणीच त्याचा मनावर कोरला गेला होता… म्हणूनच तो जरासा विचित्र वागतो. त्याला या व्यवसायात कधीही यायचं नव्हतं… चांगचा ग्रॅज्युएट झाला होता तो… पण वडिलांच्या धाकाने त्याला या व्यवसायात उतरावं लागलं. नाहीतर आज तो कोणत्यातरी सरकारी खात्यात ऑफिसर असता आणि सन्मानाने जगत असता.

पण नशीबापुढे कुणाचं कधी काय चाललं आहे… नवर्‍याने आदेश दिला म्हटल्यावर सिंधू त्याच्या बाजूला बसली आणि म्हणाली “काही काम आहे का?” तसं त्याने जरा जरबेनेच पाहिलं, आपला हात तिच्या मांडीवर नेला, तिची नाजूक मांडली दाबली… तिच्या तोंडून आह असा आवाज आला… पण तिने आपल्या वेदना दाबून ठेवल्या… वेडी ती स्त्रीची जात. शतकानुशतके आपल्या वेदना दाबून ठेवणारी… तिलाही तिच्या घरच्यांकडून हिच शिकवण मिळाली होती… स्त्रीने फक्त सहन करावं… आदित्यनाथ तिच्याकडे रोखून पाहत म्हणला, “दुखलं का?”… तिने धीर एकवटला, “थोडं… पण आपण अंगणात बसलोय. कुणी पाहिल… बरं दिसत नाही…” तसा त्याने तिच्या मांडीवरचा हात काढला… मग तो काहीही न बोलता उठला आणि आत गेला व तिला आत येण्याचा इशारा केला. तशी ती आत आली… तिने दार लावून घेतलं. आता दोघांमध्ये कसलाही संवाद होत नव्हता… त्याने आपले कपडे पटापट उतरवले व तिच्यासमोर निर्वस्त्र होऊन उभा राहिला. ती लाजली, तिने मान फिरवली… आणि एकाएकी शिकार्‍याने सावजावर झडप घालावी तसा तो तिच्यावर आरुढ झाला…

मुलं मोठी झाली की रात्रीचा संभोग विसरुनच जायचा असतो. मुलं घरात नसतानाही ही संधी साधावी लागते. मुळात या संभोगाला संभोग तरी कसा म्हणावा? संभोग म्हणजे सम-भोग… पण हा तर बलात्कारच… समाजाने, संस्कृतीने मान्य केलेला एक बलात्कार… हा असा बलात्कार मुलं घरात नसताना घडतच होता… मुळात सिंधू इतकी गोरीपान आणि सुंदर होती की तिला ओरबडताना त्याला एक असुरी आनंद मिळायचा. आपली बायको आपल्यापेक्षा लाख पटीने सुंदर आहे. या गबाळ्याला कशी मिळाली ही सुंदरी असले टोमणे त्याने बर्‍याचदा ऐकले होते. टोमणे मारणार्‍यांच्या अंगावर हात टाकण्याची त्याची धमक नव्हती… मग आपला राग शांत करण्यासाठी तो तिच्या देहाला राक्षसासारखा भोगायचा…

अनेक पुरुषांच्या नजरा तिच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत होत्या. याची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच तिला जास्त बाहेर पडायची मुभा नव्हती. घरात कुणी पाहुणे जरी आले तरी त्यांची उठ बस मिथिला करायची. पण आता तेही कठीण झालं होतं. तीही वयात आली होती… आईसारखीच सुंदर… भरीव शरीराची… तिचेही उरोज आता टवटवीट झाले होते… चालताना तिच्या पार्श्वभागाची होणारी हालचाल पौरुषी उत्तेजना जागृत करणारी होती… म्हणूनच आजकाल तो जास्त चिंतीत होता.

त्या पटापट कपडे अंगावर चढवले आणि म्हणाला देवळात जाऊन येतो… रात्री शेठजी येणार आहेत. ते आल्यावर जास्त मिरवू नकोस. शेठची नजर वाईट आहे. त्यांचा काय तो पाहुणचार मी करतो. कळलं? तिने आपले कपडे सारखे करत होकारार्थी मान डोलावली… तिने त्याला आठवण करुन दिली की आज मिथिलाच्या शाळेचा रिजल्ट लागणार आहे. तर देवळातून शाळेतच जा…

त्याने बाजायपेठेतल्या देवळात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले व तो बाजारपेठेत हिंडू लागला… हिंडता हिंडता त्याला बांगड्याचं दुकान दिसलं. आज शनिवार म्हणून बाजार भरला होता… त्याला सिंधूची आठवण झाली… आपण आपल्या बायकोला वाईट वागणुक देतोय हे त्याला माहित होतं. आपण चुकीचं करतोय हेही त्याला जाणवत होतं… पण तो मजबूर होता. लहानपणापासून ते आजपर्यंत त्याच्या मनावर जळमट साचली होती… त्याच्या मनातल्या वेदना शांत करण्यासाठी त्याला बायको नावाचा प्राणी सापडला होता… प्राण्यांचं तसंच असतं ना? एकदा का तुम्ही
एखादा प्राणी पाळला तर तो आपल्या आदेशात असतो. त्याच्याशी तुम्ही कसेही वागू शकता… पण आदित्यनाथचं मात्र त्याच्या बायकोवर मनापासून प्रेम होतं… तो तिच्यावर अत्याचार किंवा तिला मारझोड करत नव्हता… पण आपण नीच आहोत हे जेव्हा आपल्या मनावर बिंबवलं जातं तेव्हा आपल्यापेक्षा उच्च व्यक्तीचा आपण मत्सर करु लागतो. आदिर्यनाथचीही अवस्था होती.

त्याने आपल्या बायकोसाठी भारतल्या बांगड्या घेतल्या… सिंधू नटली थटली की एखाद्या राणीसारखी दिसायची… आपल्या बायकोच्या गोर्‍यापान हातावर या बांगड्या किती शोभून दिसतील… त्याच्या मनात विचार आला… तोच कुणीतरी त्याला हाक मारल्याचा भास झाला… त्याने इथे तिथे पाहिलं तर खरोखरच तिवारी त्याला हाक मारत होता… तिवारी हा व्यवसायाने शेतकरी होता… पण त्याची बरीच जमीन होती. चांगला श्रीमंत होता तो… तो आदित्यनाथ जवळ आला नि म्हणाला, “आज रात्री तयार राहा महाराज… आईची तब्येत खूप खराब आहे. रामाचं बोलवणं आजंच येऊ शकतं…” आदित्यनाथने तिवारीकडे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला की लोक किती हरामखोर असतात नै… आपल्याच घरातला माणूस जणार याचा किती तो आनंद… अरे माणूस म्हणजे काय जुनाट वस्तू आहे का? खराब झाली की फेकून द्यायला? एखादी सवयीची वस्तू जरी नाहिशी झाली तरी आपल्याला किती चुकल्यासारखं वाटतं… पण तिवारी तर आई आजारी असतानाच तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची तयारी करतोय… माणूस या पृथ्वीवरला सगळ्यात नीच प्राणी आहे… त्याने तिवारीला होकार दिला. तिवारी निघून गेला… पण एके ठिकाणी त्याची नजर खिळली. त्याची कुतुहलता जागी झाली… त्या रात्रीचा तो तरुण त्याला बाजारात दिसला… हो तोच… ज्याच्या बायकोवर त्याच्याच बापाने बलात्कार केला होता… आदिनाथने त्याला गाठायचं ठरवलं…

क्रमशः

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

#महापात्रा_दीर्घ_कथा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01