Crispy

कुणी, सत्ता देता का रे? सत्ता?


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कुणी, सत्ता देता का रे? सत्ता?
एका इंजिनाला कुणी सत्ता देता का?

एक इंजिन वाफे वाचून,
रुळा वाचून,
जनतेच्या मता वाचून,
काकांच्या दये वाचून,
शिवाजी पार्कात हिंडत आहे.
जिथून कुणी उठवणार नाही,
अशी खुर्ची ढूंढत आहे,
कुणी, सत्ता देता का रे? सत्ता?

काय रे बाळा, खरंच सांगतो दादांनो
इंजिन आता थकून गेलंय,
वांद्रे-दादरात, दादर-वांद्र्यात
अर्ध-अधिक तुटून गेलंय
घराच्या खाटेवरती,
झुलणार्‍या झोक्यावरती
झोप झुंज घेऊन घेऊन,
इंजिन आता थकलंय.

तुटके फुटके पार्ट्स हालवित,
खुरडत मुरडत चालत आहे,
खरं सांगतो दादांनो,
इंजिनाला आळशीपणा नडतोय रे,
हे.. दादा.. कुणी सत्ता देता का रे? सत्ता?

इंजिनाला महाल हवाय,
राजवाड्याच्या थाट हवाय,
पदवी हवीय, हार हवाय,
थैली मधली भेट हवीय,
वट हवीय मुंबईभर…
गाडी मधून हिंडण्यासाठी,
एक हवीय सत्ता खुर्ची
कुटुंब नियोजन करण्यासाठी…
एक राऊंड टेबल हवंय..
मागच्या अंगणात.. बसण्यासाठी.
कुणी सत्ता देता का रे? सत्ता?

@दिल्लीचा भाट


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01