Crispy

घॅंदी इटालियन सूप

नमस्कार मित्रांनो, आज आपण घॅंदी इटालियन सूपची रेसिपी जाणून घेणार आहोत. हे सूप लई ग्वॉड लागतंय. बनवताना फारसं डोकंही लावायची गरज नाही. साहित्य सुद्धा रोजचेच आहेत. त्यामुळे सूपची रेसिपी अतिशय सोपी आहे. पण या सूपसाठी अत्यंत महत्वाचा पदार्थ म्हणजे मुरलेली लाचारी. ती जर व्यवस्थित मुरली तरच सूप ग्वॉड लागतंय हे मात्र लक्षात घ्या.

तर मग या सूपची रेसिपी जाणून घ्या आणि बनवून झाल्यावर आम्हाला आपली प्रतिक्रीया नक्कीच कळवा.

साहित्य:

६ ते ७ नग घराणेशाही
भरमसाठ सेक्यूकरिज्म
मूठभर किसलेले घोटाळे
मूठभर जातीयवाद
चिमूटभर शिवभक्ती
एक वाटी खवलेली गुलामी किंवा निष्ठा
चवीनुसार हिंदुत्व
मुरलेली लाचारी
४-५ पाकळ्या सहानुभूती
चुल्लू-भर पाणी

कृती:

१. कोणतीही तयारी करायच्या आधी लाचारी मुरवण्यासाठी फ्रीझमध्ये ठेवा.
२. त्यानंतर घराणेशाही स्वच्छ धुवून घ्यावी
३. मंद आचेवर एका वाडग्यात बरेचसे तेल घाला, त्यात स्वच्छ धुतलेली घराणेशाही टाका.
४. ब्राऊनिश होईपर्यंत चांगले परतून घ्या.
५. नंतर त्यात भरमसाठ सेक्यूलरिज्म घाला व चांगले परतून घ्या.
६. आता त्यावर झाकण ठेवा.
७. मूठभर किसलेले घोटाळे, मूठभर जातीयवाद, ४-५ पाकळ्या सहानुभूती मिक्सरमध्ये वाटून घ्या.
८. मिश्रण चांगलं झालं की वाडग्यात घाला आणि पुन्हा चांगले परतून घ्या.
९. आता त्यात खवलेली गुलामी घाला
१०. आता चिमूटभर शिभक्ती घाला, यामुळे खमंग सुगंध पसरेल
११. चवीनुसार हिंदूत्व घालून चांगलेच ढवळून घ्या. ढवळल्याने नेमकं काय काय घातलंय याचा थांगपत्ता लागत नाही.
१२. आता सर्वात शेवटी चुल्लू-भर पाणी घाला आणि अर्धा तास झाकण लावून सूप शिजू द्या.
१३. अर्ध्या तासानंतर सूप चांगलेच तयार झाले आहे.
१४. आता सर्वात आधी फ्रीझमधील लाचारी किती मुरलीये ते पाहून घ्या. लाचारी जितकी मुरलेली असेल तितकी स्वादिष्ट लागेल.
१५. आता घॅंदी इटालियन सूप तयार झाल्यामुळे डिशमध्ये सर्व्ह करा आणि लाचारीसोबत सुर्र्के प्या.

@उजवा आचारी जयेश

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01