ज्योतिषी…

Posted on Posted in Drama / Story

ही गोष्ट तुम्ही बर्‍याचदा ऐकली, वाचली असेल. पण थोडीशी उजळणी करुया. यशाच्या मार्गावर चालण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. एका राज्यात एक प्रख्यात ज्योतिषी राहत होता. त्याने सांगितलेले भविष्य खरे ठरायचे अशी लोकांची समजूत होती. दूर दूरच्या गावांतून लोक त्याला भेटायला यायचे. आपल्या आयुष्याविषयी चर्चा करायचे. ज्योतिषी त्यांना उत्तम मार्गदर्शन करायचा. ज्योतिष्याचं असं म्हणणं होतं की […]

चिंता

Posted on Posted in Drama / Story

रामचरण तसे उद्योगी व्यक्ती. उद्योगी म्हणजे काहीतरी नवीन करत राहणं. तशी त्यांना उद्योग करण्याची भारी हौस. अनेक उद्योग त्यांनी केले, पण यश मिळेना. तरीही त्यांनी हार मानली नव्हती, माघार घेतली नाही. त्यांचं काम ते करत राहिले. त्यांच्या पत्नीने कधी त्यांच्याकडे तक्रार केली नाही. तिला त्रास व्हायचा. पण तिने कधी बोलून दाखवलं नाही. रामचरण डोळ्यांत स्वप्न […]

विजय लोखंडेला कोणी मारलं?

Posted on Posted in Drama / Story

पात्र १) अनिल लोखंडे {वय : ३५ वर्षे) २) सुरेखा लोखंडे (अनिलची पत्नी) {३० ते ३५} ३) अंकिता लोखंडे (अनिलची बहिण) {२२ ते २५ वर्षे} ४) इन्स्पेक्टर सत्यजित काळे {वय ४० वर्षे} ५) हवालदार रामचंद्र पाटेळे (वय ४० ते ५० वर्षे} ६) कॉन्स्टेबल प्रधान {४० ते ५० वर्षे} ७) अस्लम भाई {४० ते ४५ वर्षे} […]

दृष्टीकोन

Posted on Posted in Drama / Story

एका गृहस्थाला कामासाठी आसनगावात जायचे होते. त्याची त्या गावात बदली झाली होती. कित्येक वर्ष स्वतःच्या गावातच नोकरी केल्यामुळे अचानक गाव सोडावं लागणार या काळजीने तो चिंतीत होता. त्या गावचे लोक कसे असतील? त्यांचा स्वभाव कसा असेल? ते आपल्याशी जुळवून घेतील ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घुटमळत होते. बदली झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. म्हणजे […]

बाप्पाच्या प्रदक्षीणा

Posted on Posted in Drama / Story

ही कथा तुम्ही बर्‍याचदा ऐकली आहे. पण भगवंताच्या भक्तीपोटी. आता आपण कर्मासाठी ही गोष्ट पुन्हा नव्याने जाणून घेऊया. कार्तिकेयच्या मनात गणेशाबद्दल असूया निर्माण झाली. मुळात असूया असण्याचं काहीच कारण नव्हतं. दोघेही एकमेकांच्या जागी श्रेष्ठच होते. पण काम, क्रोध, मोह, माया आणि मत्सर हे देवांनाही चुकले नाही. कार्तिकेय आपल्या आईला म्हणाला “माते, तू माझ्यापेक्षा गणेशवर जास्त […]

सावज

Posted on Posted in Drama / Story

अक्सा बिच शेजारी असलेल्या ट्रेंड्स पबमध्ये बसून तो व्हिस्कीचा आस्वाद घेत होता. त्याची नजर मात्र सावजाच्या शोधात होती. पण त्या पबमध्ये सावज होण्याची कुणाचीही कुवत नव्हती. होय, सावज होण्याची सुद्धा कुवत असावी लागते. प्रत्येकाची स्वतःची एक चॉईस असते. तशी त्याचीही चॉईस होती. सावज कसं असावं? सुंदर, आकर्षित, पाहता क्षणी झडप घालावी असा फील आला पाहिजे. […]

संध्या…

Posted on Posted in Drama / Story

माझ्या आयुष्यात अनेक केसेस मी हाताळल्या. पण ती केस विशेष होती. संध्या धावडे ही एक सुंदर नवतरुणी. ती १७ वर्षांची होती. गोरी गोरी पान, मोठे रेखीव डोळे, पण डिप्रेशनमुळे तिच्या डोळ्याभोवती काळे डाग स्पष्ट दिसत होते. तिचे बाबा जेव्हा तिला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आले तेव्हा ती खुपच घाबरलेली होती. तिचे बाबा ज्ञानेश धावडे, ते सुद्धा […]

साक्षात्कार…

Posted on Posted in Drama / Story

मुळात पीटर डिसोझाच्या खुनामागे रोझीचाच हात असेल अशी शंका पोलिसांना येणे स्वाभाविकच आहे. डिसोझा कुटुंबातील एकूण चार सदस्यांपैकी त्यांच्या मृत्यूचा सर्वात जास्त फायदा रोझीलाच होणार होता. अर्थात कुणाच्याही मृत्यू मागे अनेकांना काही ना काही फायदा होतोच. अगदी काहीच फायदा झाला नाही तरी किमान आनंद तरी होतोच. म्हणजे कल्पना करा ना की तुम्हाला एखादी न आवडणारी […]

स्वप्न-दोष भाग ५

Posted on Posted in Drama / Story

म्हणजे डोळ्यात टाकण्याचं ते औषध जर कुणाला जेवणातून दिलं तर माणूस भयंकर आजारी पडू शकतो. त्याचा रक्तदाब वाढतो, उलट्या येतात, पाचनशक्ती संपत जाते, तो कोमामध्येही जाऊ शकतो. बापरे, औषध सुद्धा विषाचं काम करु शकतं हे किती धक्कादायक आहे ना. गावडे काही महिला पोलिसांसह शैलेशरावांच्या घरी निघाले. संगीताला अटक करण्याचा क्षण समीप आला होता. फाईल तपासताना […]

स्वप्न-दोष भाग ४

Posted on Posted in Drama / Story

मी संध्याकाळी ५ वाजता घरी परतलो. फ्रेश होऊन मी सिगरेट पेटवली. तो सापळा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. मी आणि गावडेंनी दुपारी बाहेरच भोजन केलं. गावडे जरासे स्वतःवरच नाराज दिसले. कारण सुनयनाचं प्रेत जर त्यांना दहा वर्षांपूर्वीच सापडलं असतं तर शैलेशरावांवर आता ही पाळी आलीच नसती. पण कुणी मारलं असेल सुनयनाला? सुनयनाला मारुन कुणाचा फायदा […]