पर्स

Posted on Posted in Crispy

संध्याकाळची वेळ, तो आणि ती मावळत्या सुर्याला पाहून उगवत्या आयुष्याचे स्वप्न रंगवत होते. ती म्हणाली, “ए तुला मुलगा हवाय की मुलगी?” तो म्हणाला, “असं काही नाही… असा विचार केलाच नाही” “सांग ना प्लीझ”, ती म्हणाली. तो तिच्या नजरेत नजर घालत म्हणाला, “तुला फार घाई झाली आहे. पण मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी आधी तयारी तर करावी […]

झाल्या तिन्हिसांजा….

Posted on Posted in Crispy

पूर्वीचे दिवस किती वेगळे होते. रात्री लवकर निजून, सकाळी लवकर उठायचे. सातच्या आत घरात यायचे… आपल्याकडे तिन्हीसांजला फारच महत्व प्राप्त झाले आहे. पण ते महत्व आता कमी होताना दिसत आहे. पूर्वी समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या घरात तिन्हीसांज झाली की दिवे लागायचे. बाप्पासमोर बसून छानपैकी शुभंकरोती म्हणायची, नित्यपाठ असायचा… किती सुंदर दिवस होते ते… पण आता […]

जोरु का गुलाम

Posted on Posted in Crispy

पप्पूने ठरवलं होतं की तो त्याच्या बायकोवर कोणतेच बंधनं लादणार नाही. स्त्री स्वातंत्र्याचं महत्व त्याला पटलं होतं, असं मुळीच नव्हतं. पण अनेक वर्ष त्याचं लग्न जमत नव्हतं. आता जे लग्न ठरलंय ते काही केल्या तुटू नये असं त्याला वाटत होतं. त्याच्या मनात स्वप्नांचा मनोरा फुलू लागला. बायकोला काहीच कमी पडू द्यायचं नाही. तिची मनोभावे सेवा […]

आता “सोसल” मिडिया…

Posted on Posted in Crispy

“राज”गडावर पहाटेच्या किरणांनी दचकतच नियमितपणे हजेरी लावली. राजे मात्र साखर निद्रेत होते. निद्रेमध्येही राजेंची मुद्रा वैतागलेलीच होती. दहा वर्षांपूवी वैताग हा सद्भाव त्यांनी धारण केला होता. दादा महाराजांशी फारकत घेतल्यापासून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना फारसा वेळ लागला नाही. आता हळू हळू आकाश उजळू लागलं होतं. तसा राजगडही उजळला. खिडकीतून येणार्‍या प्रकाशाने गुस्ताखी करत […]

असेही बाबासाहेब

Posted on Posted in Crispy

माझ्यापेक्षा तरुण असलेली मुलं जेव्हा माझ्याकडून पुस्तकं वाचायला नेतात तेव्हा मला प्रचंड आनंद होतो. आजच्या सोशल मिडियाच्या युगात नवतरुणांना पुस्तकं वाचायला आवडतात, हेच विशेष कौतुक वाटतं. परवाच दिपक गावडे नावाच्या एका नवतरुण मित्राने स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचण्यासाठी मागितले. अर्थात ते मी त्याला दिले. पण आपल्या संग्रहातील पुस्तक कुणालाही देताना मनाला थोडीशी भिती वाटत असतेच. दिलेले […]

आणि चित्रपट झोपून पाहिला

Posted on Posted in Crispy

हाय साला… आपल्याला बच्चन साहेब फार आवडतात. मला जेवढं काही अभिनयातलं कळतं त्यावरुन सांगतो बच्चन साहेबांची ज्यावेळी कॅमेराकडे पाठ असते, तेव्हा सुद्धा त्यांचा अभिनय दिसून येतो. चांगला आवाज अनेकांना लाभलेला असतो पण आवाजाचा उपयोग कसा करायचा हे आमच्या बच्चन साहेबांनाच चांगले कळते, अशी माझी श्रद्धा आहे.   बरेच दिवस बच्चन साहेबांचा सिनेमा पडद्यावर पाहिला नव्हता. […]

इंग्लिश-विंग्लिश

Posted on Posted in Crispy

माझं शिक्षण इंग्लिश मिडियममधून झालं. इंग्लिश मिडियममध्ये शिकलो असलो तरी लहानाचे मोठे आम्ही झोपडपट्टीत झालो. त्याकाळी इंग्रजी माध्यमाचं फारसं फ्याड नव्हतं. आज हे फ्याड जरा जास्तच ब्याड झालंय. माझे अनेक मित्र मराठी माध्यमातंच शिकलेले. मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो असल्यामुळे चार मुलांमध्ये उठून दिसायचो. पण खरं सांगयचं झालं तर मी झोपडपट्टीछाप.. “च्यायला च्यामायला” हे आपले पहाटेचे […]

दुनिया गोल है भाई…

Posted on Posted in Crispy

गण्या आणि पम्या तसे सुशिक्षित तरुण. दोघेही एकाच कंपनीत कामाला आहेत. पगारंही चांगला आहे. दिसायलाही दोघे देखणे व चांगल्या घरचे. संध्याकाळी ऑफिस सुटलं की बसस्टॉपवर उभं राहून रोज पोरींना न्याहाळत बसणे हा त्यांचा उद्योग. लाल वाली माझी, पिवळी वाली तुझी, असं म्हणत त्यांची संध्याकाळ मजेशीर जायची. एखादी नवीन आयटम दिसली की बस्स.. हिला आधी कोण […]

ती अजूनही तुमच्या मनाच्या खांद्यावर आहे

Posted on Posted in Crispy

आपल्या मनात एखादी गोष्ट बसली की तिला मनापासून वेगळे करणे कठीण जाते. आपल्याला तिच तिच गोष्ट मनाच्या पटलावर दिसत राहते. समोरच्याने सांगितलेला संदेश आपल्या मनाने चुकीच्या पद्धतीने घेतला तर आपल्याला जे समजले आहे तेच बरोबर आहे, हे दाखवण्याचा अट्टाहास हे मन करीत असतं. या मनाची ख्याती सांगण्याचा मोह बहिणाबाईंनाही अवरता आला नाही. समर्थ रामदासांनी मनावर […]