Articles

रंगमंच

Posted on

त्या दिवशी संध्याकाळी चर्चगेटवरुन ट्रेन पकडली. चर्चगेटवरुन ट्रेन पकडली की बसायला मिळतं. नाहीतर मुंबई लोकलच्या गर्दीत तुम्हाला व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी देव पावला म्हणायचा. विंडो सीट मिळाली होती. मी निवांत बसलो होतो. गाडी एकदाची सुटली. काही लोकांनी स्वतःलाच कसल्या तरी खाणाखुणा केल्या. त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली होती. मी मुंबईकर असल्याने […]

Articles

एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी

Posted on

एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी “चिते कि नज़र, बाझ कि चाल और बाजीराव कि तलवार पर संदेह नही करते, कभी भी मात दे सकती हैं” हा डायलॉग रणवीरने अतिशय उत्तम म्हटला आहे. सुरुवातीला ब्राह्मणी पोशाख परिधान केलेला रणवीर हा संवाद म्हणतो आणि प्रेक्षगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. रणवीर सिंह (राजीराव), दिपिका पदूकोन (मस्तानी), प्रियंका चोप्रा […]

Articles

कॅथार्सिस थेरपी देणारा “कवडसा”

Posted on

वाचण्यासाठी पुस्तक उघडलं आणि पुस्तकातील सफेद पृष्ठांवरील काळ्या शाईतले शब्दन शब्द मनावर ताबा मिळवू लागले. पुस्तक वाचून हातावेगळं केलं. पण मनावेगळं करु शकलो नाही. पुस्तकांतून आलेल्या शब्दरुपी कवडशाने मन चमकून गेले. पुस्तकाचं नाव “कवडसा”, लेखिका “प्रज्ञा माने”. माझे मित्र हर्षद माने यांची लहान बहिण प्रज्ञा. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव प्रज्ञा का ठेवलं असावं याची प्रचिती […]

Articles

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या संकुलाला “नाटककार स्वा. सावरकर नाट्य नगरी” असे नाव देण्यात यावे

Posted on

९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या विद्यमाने ठाणे नगरीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ‘वस्त्रहरण’ फेम नाटककार गंगाराम गवाणकर आहेत. ठाणेकरांसाठी हा आनंदाचा सोहळा असणार आहे. कारण ठाण्यात होणारं हे पहिलं नाट्य संमेलन आहे. मुंबई प्रमाणे ठाणे सुद्धा एक सांस्कृतिक नगरी आहे. तर ठाण्यात होणार्‍या अखिल […]

Articles

बिनडोक कोण आहेत?

Posted on

दिनांक २ डिसेंबर रोजी लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला “बिनडोकांची राष्ट्रभक्ती” हा अग्रलेख वाचला आणि मी स्वतः राष्ट्रभक्त आहे का? या विचारात पडलो. राष्ट्रभक्तीची अशी एक व्याख्या सांगता येत नाही. मग राष्ट्रभक्ती म्हणजे काय? तर आपला देश कोणामुळे स्वतंत्र झाला असा प्रश्न सावरकरांना विचारला असताना, सावरकर म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीकरिता देवासमोर हात जोडून कुणी प्रार्थना जरी केली असेल […]

Articles

आशीर्वाद देऊ की घेऊ?

Posted on

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या वाक्याचा प्रत्यय श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आयोजित पालकांसाठी संस्कार शिबिरात आला. श्री समर्थ सेवा मंडळाने भारतातील मुले संस्कारीत व्हावी म्हणून १२ ते १४ ऑक्टोबर २०१२ रोजी पालकांसाठी “भारतीय संस्कृतीविषयक ज्ञानसंस्कार शिबिराचे” आयोजन केले होते. हे त्यांचे कार्य अर्थात वंदनीय आहे. सुदैवाने मलाही त्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. समर्थांचीच […]

Articles

हे बंध रेशमाचे… (लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्त)

Posted on

आज दिनांक २१ नोव्हेंबर २०१३.. आजच आमच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. काळ कसा जातो ते कळतंच नाही.. कधी प्रेम जडले, कधी लग्न झाले, एका इवल्याशा पाहूण्याने कधी आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि पाहत पाहता दोन वर्षे कधी सरली.. कळलंच नाही.. खरंच कळलं नाहीच.. काही वर्षांपूर्वी एकांकिका करत असताना आमची ओळख झाली.. एकांकिकेमध्ये एकत्र […]

Articles

सत-चित-आनंद देणारे सच्चिदानंद

Posted on

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, तुतेंची अर्पिली नव कविता रसाला, लेखाप्रती विषय तुंचि अनन्य झाला… या ओळी आहेत सावरकरांच्या.. याचा अर्थ असा की हे मातृभूमी, माझे मन, माझी बुद्धी, कविता, लेखन, वक्तृत्व हे सगळं फक्त तुलाच अर्पण केलं आहे, ह्या सगळ्यातुन फक्त तुझंच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे. सावरकारांच्या या […]