“भट”शाही…

Posted on Leave a commentPosted in Articles

कॉलेजचे ते दिवसच भन्नाट असतात. कुणाच्या तरी प्रेमात पडायचं. कुणाला तरी प्रेमात पाडायचं. सिद्धता नसतानाही मी तुझ्यासाठी चंद्र तारे वगैरे तोडून आणण्याची उगाच प्रौढी मिरवायची. अभ्यास कमी आणि उनाडक्या जास्त, असा तो काळ. शाळेच्या चार भिंतीतून आपण कॉलेजच्या मोकळ्या प्रांगणात येतो तेव्हा ती जी पहिली भावना असते ती प्रचंड विलक्षण असते. एक मोकळा श्वास आपण […]

सावरकर आणि मी…

Posted on Leave a commentPosted in Articles

ते दिवस खुपच वेगळे होते. ज्यांचं बालपण खुप गोड गोंडस जातं, त्यातले आम्ही नाही. आम्ही स्तोत्रे ऐकत मोठे झालो नाही. मुळात चाळ ही मुंबईतली जुनी संस्कृती. पण चाळ म्हटलं की तुम्हाला श्रीयुत गंगाधर टिपरेंची चाळ आठवत असेल. सुसंस्कृत, शुद्ध बोलणारे वगैरे वगैरे वगैरे. पण आम्हाला वास्तव चित्रपटातली चाळ आठवते. सांगण्याचे तात्पर्य आम्हा झोपडपट्टीवासियांचे पालनपोषण खुपच […]

मुसलमांनातून पुरोगामी नेतृत्व का उदयास येत नाही?

Posted on Leave a commentPosted in Articles

तीन तलाकच्या मुद्द्यावरुन भारतात अनेक प्रश्नचिन्ह उमटले आहेत. उत्तर भारतात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यावरुन असा मुद्दा समोर आला की मुसलमान भाजपला मते कसे देऊ शकतात? म्हणूनच एक अशी अफवा पसरली होती की मुस्लिम स्त्रीयांनी भाजपला मते दिले असणार. असो. खरे खोटे एव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. पण उत्तर भारतातील मुस्लिम समाजानेही भाजपला पाठींबा दिल्याचे […]

ब्राह्मणवादाचा सूड…

Posted on Posted in Articles

श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी काढलेल्या उद्गारांमुळे पुन्हा ब्राम्हणवादाला ऊत आला आहे. मी इतिहासाचा केवळ वाचक आहे. पण इतिहास लिखाणाची एक विशिष्ट पद्धत म्हणजे तत्कालिन लिखाणातील पुरावे, तर्क असे आहे. आरोप आणि प्रत्यारोप हा इतिहासलेखनाचा पाया नाही. तुकोबांना ब्राह्मणांनी मारले असे आरोप होत असतात. कारण ब्राह्मण तुकोबांच्या विरोधात होते. हा आरोप […]

बिन चिपळ्यांच्या नारदाची कथा आणि व्यथा.

Posted on Leave a commentPosted in Articles

  नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शरद पवार यांना डी. लीट. पदवी प्रदान केली. त्यावेळेस शरदरावांचे राजकारणातून संन्यास घेतलेले समकालीन आणि ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांवर स्तुतीसुमने उधळल्यावर केशवरावांनी त्यांना चिमटा काढत “‘बिन चिपळ्यांचा नारद’ असे म्हटले. केशवरावांनी नारद हा शब्द वापरण्यामागे शरद पवारांचा स्वभाव कारणीभूत आहे. त्यांनी पवारांना आणि त्यांच्या […]

दारु आणि सामाजिक भान…

Posted on Leave a commentPosted in Articles

मी बर्‍याचदा पाहिलंय की एखादा माणूस ड्रिंक करणारा असेल तर काही विशिष्ट लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात, नाके मुरडतात. जणू त्याने काही मोठा सामाजिक गुन्हा केला आहे. मुळात दारु पिणे किंवा न पिणे या वादात तसा काही अर्थच नाही. एखादी व्यक्ती ड्रिंक करणारी असेल तर ती असभ्य आहे किंवा जी व्यक्ती दारु पित नाही ती सभ्य […]

भव्यतेचं बाहुबळ, पण पहिल्या भागाशी विसंगत…

Posted on Leave a commentPosted in Articles

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक प्रवाह येतो आणि त्या प्रवाहाच्या दिशेने आपण जात असतो. एखाद्या गोष्टीची चलती झाली, तर त्या विरोधात ऐकण्याची अनेकांनी मानसिकता नसते. आपण प्रचंड भावूक होतो आणि त्या प्रवाहावर कुणी बोट ठेवले तर बोट ठेवण्यार्‍याला आपण जणू शत्रूच मानून बसतो. भारतीय समाजाला सिनेमाचं प्रचंड वेड आहे. त्यात दक्षिण भारत हा सिनेमावेडाच आहे. तिकडच्या […]

संतपट, ईश्वर भक्ती आणि लोकमानस भाग: २

Posted on Leave a commentPosted in Articles

१९२९ साली प्रभातने “गोपालकृष्ण” हा मूकपट निर्माण केला होता. हा प्रभातचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर याच नावाने १९३८ साली बोलपट निर्माण करण्यात आला. १९३८ चा गोपालकृष्ण हा १९२९ सालच्या गोपालकृष्णाचा रिमेक होता. त्यानंतर १९४६ ला याच कथेवर “गोकुळ” हा चित्रपट निर्माण झाला. हे तीनही चित्रपट शिवराम वाशीकरांनी लिहिले होते. या तीन दशकात प्रभातला एकाच विषयावरील […]

संतपट, ईश्वर भक्ती आणि लोकमानस भाग:१

Posted on Posted in Articles

मराठी प्रदेश तसा दगडांचा, डोंगरांचा कणखर प्रदेश. मराठी भाषा सुद्धा तशी रांगडी आहे. तरी सुद्धा ज्ञानेश्वरांनी अतिशय सौम्य भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली हे विशेष आहे. महाराष्ट्राला मोठेपण मिळण्यासाठी दोन गोष्टींचा मोठा वाटा आहे. एक म्हणजे मराठी साहित्य आणि दुसरे म्हणजे मराठी योद्धे. मराठी साहित्य हे मराठी जनांच्या उद्धाराचे कारण बनले आहे. तर मराठी योद्ध्यांमुळे महाराष्ट्राला दैदिप्यमान […]

गरमागरम उथळ

Posted on Leave a commentPosted in Articles

सावरकरांनी दिलेल्या साहित्यरुपी गरमागरम चिवड्याचा तुम्ही आस्वाद घेतला असेलच. जर घेतला नसेल तर अवश्य घ्या. चिवडा जसा खमंग असतो आणि त्याची चव जिभेवर तरळत राहते. सावरकरांनी दिलेल्या गरमागरम चिवड्याची चव आजही माझ्या मनात तरळत आहे. असो. तुम्ही गरमागरम उसळ खालली असेलच. पण आज आपण गरमागरम उथळ विषयी चर्चा करणार आहोत. होय, होय उथळ. आजकाल ही […]