Poem

बस स्टॉप

मूक झाले शब्द अन
मन झाले बावरे.
साजणे गं काल तुला 
बस स्टॉपवर पाहिले.

नयन तुजवर रोखले अन
वळले तुजकडे पावले.
दिव्य काया, सर्वांग माया
रुप कसे हे लाभले?

क्षण पळभर थबकला अन
लाजले उन्ह कोवळे.
आपुल्यात अंतर जरी
एक झाले सावले.

बस आली तुझी अन
मनास भरले कापरे.
मी थांबलो त्याच जागी
तरी मन मागे धावले.

स्वप्न किती सोवळे अन
वास्तव किती ओवळे.
साजणे गं काल तुला
बस स्टॉपवर पाहिले.

कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01