“भट”शाही…

Posted on Leave a commentPosted in Articles

कॉलेजचे ते दिवसच भन्नाट असतात. कुणाच्या तरी प्रेमात पडायचं. कुणाला तरी प्रेमात पाडायचं. सिद्धता नसतानाही मी तुझ्यासाठी चंद्र तारे वगैरे तोडून आणण्याची उगाच प्रौढी मिरवायची. अभ्यास कमी आणि उनाडक्या जास्त, असा तो काळ. शाळेच्या चार भिंतीतून आपण कॉलेजच्या मोकळ्या प्रांगणात येतो तेव्हा ती जी पहिली भावना असते ती प्रचंड विलक्षण असते. एक मोकळा श्वास आपण […]

सावरकर आणि मी…

Posted on Leave a commentPosted in Articles

ते दिवस खुपच वेगळे होते. ज्यांचं बालपण खुप गोड गोंडस जातं, त्यातले आम्ही नाही. आम्ही स्तोत्रे ऐकत मोठे झालो नाही. मुळात चाळ ही मुंबईतली जुनी संस्कृती. पण चाळ म्हटलं की तुम्हाला श्रीयुत गंगाधर टिपरेंची चाळ आठवत असेल. सुसंस्कृत, शुद्ध बोलणारे वगैरे वगैरे वगैरे. पण आम्हाला वास्तव चित्रपटातली चाळ आठवते. सांगण्याचे तात्पर्य आम्हा झोपडपट्टीवासियांचे पालनपोषण खुपच […]

संध्या…

Posted on Leave a commentPosted in Drama / Story

माझ्या आयुष्यात अनेक केसेस मी हाताळल्या. पण ती केस विशेष होती. संध्या धावडे ही एक सुंदर नवतरुणी. ती १७ वर्षांची होती. गोरी गोरी पान, मोठे रेखीव डोळे, पण डिप्रेशनमुळे तिच्या डोळ्याभोवती काळे डाग स्पष्ट दिसत होते. तिचे बाबा जेव्हा तिला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आले तेव्हा ती खुपच घाबरलेली होती. तिचे बाबा ज्ञानेश धावडे, ते सुद्धा […]

साक्षात्कार…

Posted on Leave a commentPosted in Drama / Story

मुळात पीटर डिसोझाच्या खुनामागे रोझीचाच हात असेल अशी शंका पोलिसांना येणे स्वाभाविकच आहे. डिसोझा कुटुंबातील एकूण चार सदस्यांपैकी त्यांच्या मृत्यूचा सर्वात जास्त फायदा रोझीलाच होणार होता. अर्थात कुणाच्याही मृत्यू मागे अनेकांना काही ना काही फायदा होतोच. अगदी काहीच फायदा झाला नाही तरी किमान आनंद तरी होतोच. म्हणजे कल्पना करा ना की तुम्हाला एखादी न आवडणारी […]

मुसलमांनातून पुरोगामी नेतृत्व का उदयास येत नाही?

Posted on Leave a commentPosted in Articles

तीन तलाकच्या मुद्द्यावरुन भारतात अनेक प्रश्नचिन्ह उमटले आहेत. उत्तर भारतात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यावरुन असा मुद्दा समोर आला की मुसलमान भाजपला मते कसे देऊ शकतात? म्हणूनच एक अशी अफवा पसरली होती की मुस्लिम स्त्रीयांनी भाजपला मते दिले असणार. असो. खरे खोटे एव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. पण उत्तर भारतातील मुस्लिम समाजानेही भाजपला पाठींबा दिल्याचे […]

ब्राह्मणवादाचा सूड…

Posted on Posted in Articles

श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी काढलेल्या उद्गारांमुळे पुन्हा ब्राम्हणवादाला ऊत आला आहे. मी इतिहासाचा केवळ वाचक आहे. पण इतिहास लिखाणाची एक विशिष्ट पद्धत म्हणजे तत्कालिन लिखाणातील पुरावे, तर्क असे आहे. आरोप आणि प्रत्यारोप हा इतिहासलेखनाचा पाया नाही. तुकोबांना ब्राह्मणांनी मारले असे आरोप होत असतात. कारण ब्राह्मण तुकोबांच्या विरोधात होते. हा आरोप […]

बिन चिपळ्यांच्या नारदाची कथा आणि व्यथा.

Posted on Leave a commentPosted in Articles

  नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शरद पवार यांना डी. लीट. पदवी प्रदान केली. त्यावेळेस शरदरावांचे राजकारणातून संन्यास घेतलेले समकालीन आणि ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांवर स्तुतीसुमने उधळल्यावर केशवरावांनी त्यांना चिमटा काढत “‘बिन चिपळ्यांचा नारद’ असे म्हटले. केशवरावांनी नारद हा शब्द वापरण्यामागे शरद पवारांचा स्वभाव कारणीभूत आहे. त्यांनी पवारांना आणि त्यांच्या […]

एकांकिका विकृत

Posted on Leave a commentPosted in E Books

माणसातील विकृती त्याला कोणत्याही थराला नेऊ शकते. ही एकांकिका वाचून आपली प्रतिक्रीया नक्की कळवा. एकांकिका वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा:    

दारु आणि सामाजिक भान…

Posted on Leave a commentPosted in Articles

मी बर्‍याचदा पाहिलंय की एखादा माणूस ड्रिंक करणारा असेल तर काही विशिष्ट लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात, नाके मुरडतात. जणू त्याने काही मोठा सामाजिक गुन्हा केला आहे. मुळात दारु पिणे किंवा न पिणे या वादात तसा काही अर्थच नाही. एखादी व्यक्ती ड्रिंक करणारी असेल तर ती असभ्य आहे किंवा जी व्यक्ती दारु पित नाही ती सभ्य […]

एकांकिका: विजय लोखंडेला कोणी मारलं?

Posted on Leave a commentPosted in E Books

विजय लोखंडेला कोणी मारलं? ही एकांकिका हिंदी भाषेत २०१६ च्या युथ फेस्टिवलमध्ये सादर झाली. अक्षय कांबळे ने एकांकिकेचे दिगदर्शन केले. तसेच ०९.०५.२०१७ रोजी आकाशवाणी/सह्याद्रीकरिता रेकॉर्ड झाली. एकांकिका वाचण्यासाठी या फोटोवर क्लिक करा: