Poem

आरती भारतमातेची…

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

आरती भारतमाता॥
गातो आर्ततेने सूता॥
जन्मले साधुसंत॥
तुझी थोर आहे गाथा॥ध्रु०॥

दुष्टांचा नाश करी॥
वंदे मातरम मुखी॥
लढले धर्मवंत॥
तुझा शिवाजी त्राता॥आरती ॥१॥

दिधले ज्ञान जगी॥
प्रेम अर्पियले युगी॥
विश्व कल्याण॥
बोले ज्ञानियांचा राजा॥आरती ॥१॥

सुंदर लोभस काया॥
आभाळाएवढी माया॥
जाहलो भाग्यवंत॥
उदरी जन्मूनी माता॥आरती ॥१॥

आरती: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01