Poem

वय…

प्रेमात पडायचे वय राहिले नाही.
प्रेमात पाडायचे वय राहिले नाही.

तिच्या आठवणींची सर धावून आली.
पावसात भिजायचे वय राहिले नाही.

कालच दुःखाने पुन्हा साद घातली.
जनात रडायचे वय राहिले नाही.

समोरच्या खिडकीतल्या खट्टयाळ नजरा.
रूप न्याहाळायचे वय राहिले नाही.

आयुष्य जसे आहे तसे स्वीकारावे.
स्वप्नात रमायचे वय राहिले नाही.

कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01